- पोलीस बंदोबस्तामुळे धम्मभूमी परिसराला आले होते छावणीचे स्वरूप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- कोरोनाच्या पार्शभूमीवर मोजक्या बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमीत बुद्धवंदना संपन्न झाली. उपस्थितीत अनुयायांनी बुद्धमूर्ती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिस्तुपाचे मनोभावे दर्शन घेतले. बुद्धविहार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
धम्मभूमी परिसर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. बुद्धविहार कृती समितीच्यावतीने सकाळी १० वाजता धम्मभूमीचे अनुवर्तक सयाजी गायकवाड यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्या करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास मधुकर समिती गायकवाड यांच्या हस्ते वंदन करण्यात आले. पंचशील ध्वजारोहण प्रकाश बडगे, पगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्यासह ५ पोलीस निरीक्षक, ७५ हवालदार, ३५ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे – मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


















