- नवीन वर्षात मिळणार पालिकेला नवीन आयुक्त?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे सुटीवर गेले आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने आणि बहुतांश अधिकारी रजेवर गेले आहेत. पालिका भवनात सोमवार (दि. २८) पासून शुकशुकाट जाणवत आहे. बदली होणार असल्याने आयुक्त रजेवर गेले आहेत,अशी चर्चा पालिका आवारात सुरु आहे.
तसेच, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली झाली असून, आयुक्तांसह उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्तांचे कामकाज अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे आहे. ते नियमित कामकाजासह विविध बैठकांमध्ये व्यस्त आहेत.
आयुक्तच सुटीवर गेल्याने तसेच सलग सुट्या असल्याने सहलीचे नियोजन करून अनेक अधिकाऱ्यांनी रजा टाकल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील अनेक अधिकारी सोमवार (दि. २८) पासून सुटीवर गेले आहेत. प्रमुखच जागेवर नसल्याने उर्वरित कर्मचारीही हजेरी लावून गायब होत आहेत. पालिकेशी संबंधित काम नसल्याने नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदार नागरिकांची वर्दळ घटली आहे. त्यामुळे शुकशुकाट जावणत आहे .












