- भाडेपट्टा तत्त्वावर भूखंडाच्या क्षेत्र आणि जागेनुसार दर आकारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून १४ शैक्षणिक भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शैक्षणिक संकुल यासाठी संबंधित भूखंड दिले जाणार आहे.
प्राधिकरणाकडून चालू आठवड्यात ९९ वर्षाच्या भाडेपट्टा तत्त्वावर ई निविदेद्वारे हे भूखंड वाटप करण्याचे नियोजन आहे. या भूखंडांसाठी रहिवासी दराच्या निम्या दराने अधिमूल्य ठरविण्यात आले आहे. कमीत कमी १८१६ चौरस मीटर ते जास्तीत जास्त १६ हजार ६६१ चौरस मीटर क्षेत्रापर्यंतचे हे भूखंड आहेत.
त्यासाठी कमीत कमी ६ हजार ६४० प्रति चौरस मीटर ते जास्तीत जास्त १६ हजार ५४९ प्रति चौरस मीटर असा सवलत दर निश्चित केला आहे. भूखंडाच्या क्षेत्रानुसार आणि जागेनुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत.












