न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांच्या वतीने नुकतेच रहाटणी-काळेवाडीत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते २०२१ नुतन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. गेल्या ७ वर्षापासून या दिनदर्शिकेचे रहाटणी – काळेवाडीतील नागरिकांसाठी लोकार्पण केले जाते.
याप्रसंगी नगरसेविका सुनीता हेमंत तापकीर, भाजपा शहर जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला गावडे, युवा नेते शिवाजी खुळे, गणेश गावडे, संतोष ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेविका सुनीता तापकीर व राज तापकीर यांच्या प्रभागातील होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












