- पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षा पल्लवी पांढरेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा अध्यक्षा पल्लवी पांढरे यांच्यावतीने कोविड काळात ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवाभावी वृत्तीने इंटरनेट व केबलची अहोरात्र सेवा देणाऱ्या केबल व इंटरनेट वर्कर्सचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
युवराज लक्ष्मण अवचिते व फारुख मोहम्मद शेख यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. गोपी रामचंद्र रावत हेड (मॅनेजर) डेन मनोरंजन नेटवर्क, यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,पक्ष प्रवक्ते फझल शेख, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे, सचिन माने, माधव पाटील, दादासाहेब खानके, संगिता कोकणे, मनिषा गटकळ, भरती कदम, जन्नत सय्यद, स्वप्नाली असोले, फैमीदा शेख, वर्षा छत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जन जेंव्हा घरात बसून होता, काहींचे वर्क फ्रॉम होम चालू होते, त्यावेळी केबल आणि इंटरनेटची सेवा सुरळीत चालू राहावी म्हणून हेच केबल आणि इंटरनेट वर्कर्स अहोरात्र प्रयत्नशील होते, असे वाघेरे यावेळी म्हणाले,
कार्यक्रमाची प्रस्तावना महिला शहर कार्यध्यक्षा पुष्पा शेळके यांनी केली.












