- क्रिकेट स्पर्धांच्या निमित्ताने आठ महिन्यानंतर खेळाडू खेळपट्टीवर..
- पुण्याचा शिवांजली स्पोर्ट क्लब प्रथम तर, निगडीचा ब्रदर स्पोर्टस क्लब द्वितीय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सभापती प्रा. उत्तम केंदळे यांच्या वतीने भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
दरम्यान अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसेवक कुंदन गायकवाड, जितु पवार, दिनेश यादव, पांडाभाऊ साने, विजय घोडके, सोमनाथ काळभोर, सुशांत मोहिते, गजानन ढमाले, दीपक कुलकर्णी, तुकाराम वारंग, चंद्रकांत शेडगे, मालोजी चव्हाण, सचिन रांजणे, शेखर आसरकर, सुरज बाबर, अक्षय खोत, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवांजली स्पोर्ट क्लब पुणे, द्वितीय क्रमांक ब्रदर स्पोर्टस क्लब निगडी, त्रितीय क्रमांक- खराळवाडी स्पोर्ट क्लब, चतुर्थ क्रमांक-बुर्डे बॉईज स्पोर्ट्स क्लब, मिनी कप विजेत्यात प्रथम क्रमांक माऊली स्पोर्ट्स क्लब निगडी, द्वितीय क्रमांक मोहननगर क्रिकेट क्लब यांनी पारितोषिक पटकावले.
कोरोना महामारीच्या काळात तब्बल आठ महिन्यानंतर खेळाडूंना मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. एकूण ६४ संघांनी मुख्य स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. ३० स्थानिक संघांनी मिनी कपसाठी सहभाग घेतला होता, अशी माहिती नगरसेवक केंदळे यांनी दिली.












