- आज १६७ जणांना कोरोनाची बाधा; १९८ रुग्णांना डिस्चार्ज, नऊ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) रोजी १६७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे नऊ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष -चिंचवड ( ७४ वर्षे ) ०१ स्त्री- सांगवी ( ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – चाकण ( ६३ वर्षे ), जुन्नर ( ५८ वर्षे , ६५ ) , अम्रावती ( ६७ वर्षे ) , देहुरोड ( ३ ९ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ४४ वर्षे ) ०१ स्त्री – आळंदी ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६७ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १५६ नकारात्मक असून ६ अहवाल कोविड सकारात्मक आहे. उर्वरित २६ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६४८३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३३०५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७५४ जणांचा मृत्यू झालेला आहे.