- १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी कॉलिंग सेवा विनामूल्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- रिलायन्स जिओने ग्राहकांना १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.
जिओने IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता १ जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे.