- खासगी रुग्णालयांच्या दरवाढीला ठोकले ‘रिबीट’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांच्या बिलाचे ऑडीट केले होते. त्यामध्ये २९ रुग्णालयातील २ हजार ३३३ प्रकरणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ हजार ३१ वाढीव बिले कमी करण्यात आली. तर ३०२ बिलांची संपूर्ण पूर्तता करण्यात आली. तसेच ३ कोटी २४ लाख ९६ हजार रुपयांची बिले कमी करण्यात आली. तर एकूण १३ कोटी २३ लाख ६६ हजार रुपये बिल भरण्यात आले.
अनेक खासगी रुग्णालये अधिक बिले आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यासाठी करोना रुग्णांवर खासगी उपचार करण्याऱ्या रुग्णालयामार्फत आकारण्यात येणाऱ्या बिलांची पूर्व आणि पश्चात तपासणी करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आली होती.
आकुर्डी येथील स्टलिंग रुग्णालयाने २५३ बिले सादर केली होती. त्यापैकी १३२ बिलांची रक्कम कमी करण्यात आली. तर १२१ बिले पूर्ण भरण्यात आली. आदित्य बिर्ला रुग्णालयातील १०१ बिलांची तपासणी झाली. त्यापैकी १०० बिले कमी करण्यात आली. ओजस रुणालयातील १६५ बिलांपैकी ११० बिलांची रक्कम कमी करण्यात आली. तसेच पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयाने २४९ बिले सादर केली होती. ती सर्व बिले कमी करण्यात आली. स्टार हॉस्पिटलची ३५ बिले होती ती सर्व बिले तपासणीअंती कमी करण्यात आली आहे. ऑक्सिकेअर रुग्णालयाच्या ९९ बिलांपैकी ७० बिले कमी करण्यात आली. तर २९ बिले पूर्ण होती. सूर्या हॉस्पिटलच्या १०३ बिलांपैकी १०१ बिले कमी करण्यात आली आहे. पिंपरी येथील सिटीकेअर हॉस्पिटची एकूण १५१ बिले होती. ही सर्व बिले जादा दराने आकारल्याचे निदर्शनास आल्यावर सर्वच्या सर्व बिले कमी करण्यात आली आहे.