- संस्थानकडून दर्शन रांगेमध्ये बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांना दर्शनासाठी साई मंदिर गुरुवारी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने जाहीर केला आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूरराज बगाटे यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गाईडलाईननुसार प्रत्येक धार्मिक मंदिरात नियमावली सक्तीची आहे. साई संस्थान त्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. परंतु, सलग सुट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत देशातील विविध राज्यांतून भाविकांची गर्दी होत आहे. प्रत्येक भाविकांचे दर्शन सुखरूप व्हावे म्हणून दर्शन रांगेमध्ये बदल केले आहेत.











