- दिनदर्शिकेत प्रभागातील विकासकामांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील भाजपा नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दर्शविणारी दिनदर्शिका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे आदी उपस्थित होते. नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये असंख्य विकासकामे राबविली.
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून प्रभागातील ड्रेनेज लाईन, रस्ते डांबरीकरण, स्टॉर्म वॉटर लाईनची कामे मार्गी लावली. विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शिव शाहू संभाजी उद्याना समोरील विद्युतविषयक कामे मार्गी लावली. या सर्व कामांचा दिनदर्शिकेत समावेश करण्यात आला आहे.











