न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करून एकाला गंभीर जखमी करून खून केला. मुळशी तालुक्यातील नेरे- दत्तवाडी येथे गुरुवारी (दि. ३१) खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामदास पिंजण (वय ३५, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर नवनाथ शेडगे व ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी दिनेश रामदास पिंजण (वय ३३, रा. नेरे – दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. मयत गणेश हा फिर्यादी दिनेश यांचा भाऊ आहे. मयत गणेश आणि आरोपी शेडगे व भिंताडे हे मित्र होते. आरोपींनी अज्ञात कारणावरून हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर मारहाण करून गणेश यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केला.












