- कामगाराचा जागीच मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय प्रेस मशीनची सर्व्हिसिंग करत असलेल्या कामगाराच्या अंगावर प्रेस मशीनचे चाक पडले. त्यात कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी रात्री घडली असून, याबाबत ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश गंगाराम कोरी (वय ३०, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत मुकेश गंगाराम कोरी (वय २०, रा. कुदळवाडी मूळ रा. नेपाळ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सतीश चिंतामण भेंडे (रा. पूर्णानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.