न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेस बोगस एफडीआर (परफॉर्मन्स डिपॉझिट रिसीट) व बैंक गॅरंटीची बोगस प्रमाणपत्रे दिलेल्या १८ दोषी ठेकेदारांवर शनिवारी (दि. २) फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि. १) हा दावा केला.
दोषी ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या स्थायी समितीच्या ठरावाबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या संदर्भात आयुक्तांना विचारले असता ते बोलत होते.
ते म्हणाले की, दोषी १८ ठेकेदारांबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुटीवर जाण्यापूर्वीच दिले आहेत. आतापर्यंत गुन्हे दाखल व्हायला हवे होते. कोणत्याही स्थितीत आज गुन्हे दाखल केले जातील. तसे आदेश स्थापत्य विभागास दिले आहेत.