- पोलिसांनी सापळा रचून केली दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- चिखली येथील भिमशक्ती नगर झोपडपट्टीतील दोघांकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता ४० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्टल आणि दीड हजार रुपये किमतीचे तीन जीवंत काडतुसे आढळले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुस जप्त करुन आरोपींना अटक केली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संतोष बिभिषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण महादेव बनसोडे (वय- ३२ रा. भिमशक्ती नगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली), जयभिम भिका भालेराव (वय-२६ रा. भिमशक्ती नगर, झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. २) रात्री पावणे बाराच्या सुमारास झाली.
















