- महापालिकेतील घडामोडीही कानावर येतात..
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोडला सत्ताधाऱ्यांना घाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- ”पिंपरी – चिंचवड महापालिकेत बरंच काही चाललं आहे. असे कानावर येते. फक्त कानावर येवून चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो”, असे उपमुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना ‘हेल्थ-३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यातील १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले तर, फसवणूक केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार महापालिकेने पोलिसांकडे दिली आहे.
याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘ बोगस एफडीआर प्रकरण दाखवा त्याचे पुरावा द्या चौकशी लावतो. तसेच महापालिकेत बरंच काही चाललं आहे. असे कानावर येते. फक्त कानावर येउन चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो’ असेही ते म्हणाले. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.


















