- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पालिकेची हद्द वाढविण्याचे स्पष्ट संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लगतच्या गावांना घ्यायचे आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत वाढ होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड शहर तयार झाले. येथील विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला. पुणे-मुंबई महमार्गाचे रुंदीकरण करताना अनेक घरे हटविण्यात आले. तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचेही घर काढले. विकासकामांसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेतील गैरकारभाराची चर्चा होत असते. त्याबाबत आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, त्यानंतर चाैकशी करता येईल.


















