- महापौर उषा ढोरे यांचे पालिका आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास असणा-या मिळकतधारकांनी यापूर्वी निवासी मिळकतींचा अवैध बांधकाम शास्तीकर भरलेला आहे. अशा नागरिकांचा अवैध बांधकाम शास्तीकर पुढील येणा-या मिळकतकराच्या बिलातून वजा अथवा समायोजित न करता महापालिकेकडून अशा मिळकतधारकांना मिळकतकर बिले देण्यात आलेली आहेत.
याबाबत पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या, नागरिक तकारी करीत आहेत, महापालिकेकडून निवासी मिळकतधारकांना देण्यात आलेली मिळकत कर बिले तात्काळ माघारी घेऊन निवासी मिळकतधारकांनी यापूर्वी भरणा केलेला अवैध बांधकाम शास्तीकर पुढील मिळकत कराच्या बिलामध्ये समायोजित करुन आगामी मिळकत कराचे बिले अचूक देणेबाबत आयुक्तांनी कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















