- ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने होणारी खंडोबा यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. नुकतीच खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठ झाली. त्यात ग्रामस्थांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.
ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल काळभोर, सचिव अॅड. संजय दातीर – पाटील यांनी ही माहिती दिली. दरवर्षी पौष शुद्ध षष्ठीला आकुर्डीतील ग्रामदैवत खंडोबाची यात्रा असते. दीड ते दोन लाख भाविक या निमित्त दर्शनासाठी येत असतात. यंदा ही यात्रा मंगळवार (दि. १२) आणि बुधवार (दि. १३) या दिवशी होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा यात्रा रद्द करण्यात आली आहे.