- गुन्हे दाखल नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२१) :- कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दाखल केलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलिसांनी समज देऊन त्यांची नावे लिहून घेतली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ नुसार कारवाईच्या नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली होती. याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी आवाज उठवत पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
















