न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २१ जानेवारी) रोजी १०३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील दोन व हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९२४५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५९५१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७९० जणांचा मृत्यू झालेला आहे.


















