- पत्नी, सासू आणि मेहुण्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- मानसिक छळ करून तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. हा प्रकार २ जानेवारी २०१९ पासून १३ डिसेंबर २०२० या कालावधीत सहकारनगर, ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी तरुणाची पत्नी, सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी रोशनी पाटील, सासू बेबाबाई हिरालाल पाटील, मेहुणा मयूर हिरालाल पाटील (सर्व रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी राजेंद्र मिठाराम पाटील (५८, रा. भिलाली, ता. पारोळा, जि. जळगाव) यांनी बुधवारी (दि. २०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज राजेंद्र पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनोज यांच्या नावावर असलेली जमीन आरोपी पत्नी रोशनी हिच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुणा यांनी मनोज यांचा मानसिक छळ केला. त्या छळाला कंटाळून मनोज यांनी काळेवाडी येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.