- दहा हजारांऐवजी मिळणार २५ हजारांचे अर्थसहाय्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत ‘ दिव्यांग व्यक्तींना चलन – वलन साधने वाटप अर्थसहाय्य योजना ‘ राबविण्यात येत असून त्यासाठी देण्यात येणाऱ्या १० हजार रुपयाच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करून २५ हजार रुपये चलन – वलन साहित्यासाठी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
शहरातील दिव्यांगांना चलन – वलन साहित्य घेण्यासाठी एकदाच रुपये १० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र चलन-वलन साहित्याच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता त्यामध्ये ‘ वाढ करण्याची मागणी विविध संस्थांनी वाढ महापालिकेकडे केली होती.


















