न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २२ जानेवारी) रोजी १६६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील दोन स्त्रिया चिंचवड (४५ वर्षे), सांगवी (६४ वर्षे) यांचा मृत्यू झालेला आहे. तर हद्दीबाहेरील नगर येथील ५७ वर्षीय पुरुष व जुन्नर ६७ वर्षे, आर्वी, पुणे येथील ७२ वर्षीय स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९४११ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६०७० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७९२ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















