- आरोपीस पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- खंडणीविरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीची बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. जेसन डिकोना (वय २४, रा. संघमित्रा हाऊसिंग सोसायटी, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
फरारी आणि तडीपार गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस कर्मचारी संदीप पाटील आणि शैलेश मगर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
सराईत गुन्हेगार डिकोना निगडी ओटास्किम येथील स्माशनभूमी रस्त्यावर थांबला आहे. त्याच्याजवळ पिस्तुलासारखे हत्यार असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी २१ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. झडतीत बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे गुन्हा आढळली. डिकोना हा सराईत गुन्हेगार खंडणीविरोध असून त्याच्यावर हत्यार बाळगणे आणि महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पलोसी निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिली.
















