- पिं. चिं. पोलीस आयुक्तालयाकडून चोरीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- वाकड, हिंजवडी व सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोख रक्कम तक्रारदारांना परत देण्यात आले. एकूण ४९ गुन्ह्यातील एक कोटी ४८ हजार ५९६ रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. वाकड पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. २१) हा कार्यक्रम पार पडला.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते नागरिकांना नागरिकांना मुद्देमाल करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, बाळकृष्ण सावंत, रंगनाथ उंडे यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कृष्ण प्रकाश म्हणाले की, पोलिसांना लोकाभिमुख होणे आवश्यक आहे. पीडित मोठा असो की छोटा, श्रीमंत असो की गरीब, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. काहीजण पद, पैसा या जोरावर पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. पोलिसांकडून मोठी अपेक्षा केली जाते. चांगले काम केले तरी काहीजण त्यांच्याविरोधात आंदोलन करतात. नाही केले तरी त्यांच्यावर टीकाच केली जाते. पोलिसांनी मुद्देमाल केवळ शोधला नाही तर फिर्यादीपर्यंत पोहोचविला हे महत्वाचे आहे. नागरिकांप्रमाणेच आमचे चिमुकले देखील घरी आमची वाट पाहत असतात. आमचे कुटुंबीयही घरी काळजी करतात. मात्र, पोलिस कर्तव्याशी एकनिष्ठ राहून कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी झटत असतो. स्वत : पेक्षाही नागरिकांची काळजी करतात. चांगल्या कामासाठी समाजाचे सहकार्यदेखील अपेक्षित आहे. पोलिसांची मानसिकताही जाणून घ्या, भावनिक उद्गारही कृष्ण प्रकाश यांनी यावेळी काढल.
प्रास्ताविक सहायक आयुक्त गणेश बिरादार यांनी केले.
















