- पिं. चिं. इलेक्ट्रिकल कॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना यमुनानगर, युवासेना, सुलभा उबाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने यमुनानगर येथे आयोजित राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते झाले.
वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी आहेत. आयर्न किताब पटकविल्याबद्दल पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष बक्षी, उपाध्यक्ष जावेद मुजावर, सुनील पवार आदी उपस्थित होते.












