- नरेंद्र इंडस्ट्रीयल रिसोर्सकडून शासनाची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- ठेकेदारी पद्धतीने कामगार पुरविताना कामगारांचा पीएफ इएसआय आणि जीएसटीची एकूण ६२ लाख २३ हजार ३१४ रुपये न भरता शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी पांडूरंग खोत आणि एक महिला (दोघेही रा. चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. सिद्धेश्वर मल्हारी टकले (वय ३५, रा. भोसरी) यांनी शुक्रवारी (दि. २२) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जून २०१३ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये घडली.
यातील महिला आरोपी ही नरेंद्र इंडस्ट्रीयल रिसोर्सची मालक असून आरोपी खोत हा त्यांचे काम पाहतो. आरोपी हे डी. डी. एन्टरप्रायझेस कंपनीत कामगार पुरवितात. जून २०१३ पासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांचा पीएफ, इएसआय आणि जीएसटी शासनाला न भरता शासनाची ६२ लाख २३ हजार ३१४ रुपयांची फसवणूक केली आहे.












