- नगरसेवक शैलेश मोरे व आकाश चतुर्वेदी यांचा पुढाकार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुली वाढावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित टोलवसुली यंत्रणा राबवली आहे. देशभरातील सर्व टोल नाके १५ फेब्रुवारीपासून कॅशलेस होणार आहेत. विना फास्टॅग टोल नाका पार करता येणार नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील वाहनधारकांच्या सोयीसाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मोफत ‘फास्टॅग ‘इंस्टॉलेशन’ ची सुविधा नगरसेवक शैलेश मोरे व आकाश चतुर्वेदी यांनी उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम चिंचवडमधील एम्पायर इस्टेट सोसायटीतील दर्शन अॅकेडमी शाळेसमोर सकाळी ९ ते ४ या दरम्यान होणार आहे.
याबाबत माहिती देताना नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, टोलनाक्यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचं ठरवलंय. फास्टॅगमुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. गाड्या न थांबता टोल नाका पार करतील. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गाड्या खोळंबून राहिल्याने होणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झाल्याने प्रदूषणही काहीसं कमी होईल.
याशिवाय सरकारकडे फास्टटॅगमुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. म्हणजे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणंही यामुळे सोपं होईल. शिवाय वाहन चालकांनाही सोबत सुट्टे पैसे वा रोख रक्कम जवळ बाळगावे लागणार नाहीत. वाहनाने प्रवास करणाऱ्यांना खर्चाचा आढावा घेणं सोपं जाईल. कारण टोल डिजीटल पद्धतीने भरल्याने त्याचा तपशील ‘अकाऊंट स्टेटमेंट’मध्ये मिळेल. त्यासाठी फास्टॅग असणे अनिवार्य आहे. शहरातील सर्व वाहन धारकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. इच्छुकांनी ९२२२२२२८५७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक मोरे यांनी केले आहे.












