न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २५ जानेवारी) रोजी ८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील दोन पुरुष चिंचवड (७४ वर्षे), काळेवाडी (६५ वर्षे) यांचा मृत्यू झालेला आहे. तर हद्दीबाहेरील देहूरोड येथील ४१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९७३८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६२४३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७९६ जणांचा मृत्यू झालेला आहे.