- नोटा चलनातून काढून घेण्याची ही माहिती चुकीची…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- चलनात असलेल्या ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा मागे घेण्यात येणार असल्याच्या बातम्यांचे रिझर्व्ह बँकेने सोमवारी अधिकृतरीत्या खंडन केले आहे. या बातम्याच चुकीच्या आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने त्याबाबत खुलासा केला आहे. या नोटा चलनातून काढून घेण्यात येणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. या नोटा चलनातून काढून घेण्याची ही माहिती चुकीची असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.











