- मराठवाडा जनविकासचे अध्यक्ष अरुण पवार ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शांतीदूत परिवाराच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर व निसर्गाशी संबंधित अनेक कामांना आपले कर्तव्य समजून सदैव सक्रिय असणारे ‘मराठवाडा जनविकास महासंघा’चे संस्थापक अध्यक्ष जनसेवक अरुण पवार यांना ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वायरलेस ग्रामीणचे डीआयजी राजेंद्र डहाळे तसेच सायबर क्राईम डीसीपी भाग्यश्री नवटके यांच्या शुभहस्ते अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला. शांतीदूत परिवाराच्या नेत्रदीपक सोहळ्यास विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, विद्याताई जाधव, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजभान जपणारी माणसं कायम ‘धार्मिक सलोखा’ टिकवण्याचेच कार्य करत असतात. त्यामुळे त्यांच्यासह इतरांमध्ये ‘राष्ट्रभक्तीची भावना’ कैक पटीने वाढली जाते. ‘मानवता’ हा सेवाधर्म सांभाळताना, अरुण पवार यांनी ‘निसर्गसेवा’ केली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्व प्रकारच्या सेवांचे दुत ठरले आहेत, असे गौरवोद्गार पुरस्कार देताना मान्यवरांनी काढले.
अरुण पवार यांनी कोणत्याही क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना जेंव्हा सन्मानित केले जाते. तेंव्हा त्या मान्यवरांची सामाजिक जबाबदारी आपोआपच वाढली जाते. त्या निमित्ताने वेगळी ऊर्जाही प्राप्त होते, असे मत व्यक्त केले.














