न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- प्रयत्न सोशल ऑरगनायझेशने प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरगावातील ‘माई बालभवन’ येथे भेट दिली. दिव्यांग अनाथाश्रमात किराणा व रोजनीशी लागणा-या गरजेच्या वस्तुंची कमतरता पाहुन त्यांना वस्तुरूपी मदत केली. माई बालभवनच्या देशपांडे यांनी आभार मानले.
यावेळी प्रयत्नचे प्रतिक भोसले, चेतन काशीद, प्रमोद यादव, संतोष थोरात, स्वप्निल डाळींवकर, प्रसाद पिंगळे, अमोल कुदळे, काटकर, प्रफुल इंगोले, राजेश गवळी, आनंद भोसले, आनंद धारविलकर, बालाजी हिंडे, योगेश प्रसाद, निलेश महाजन, चंद्रकांत व विशाल कुदळे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.