- शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- कोरोना विषाणु प्रादुर्भाव अनुषंगाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क १५ मार्च २०२० पासुन प्रेक्षकांसाठी बंद होता. महाराष्ट्र शासनाने अनलॉक ५ नुसार पर्यटन, शैक्षणिक व धार्मिक स्थळे, विविध संग्रहालये सुरु करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड सायन्स पार्क लॉकडाऊननंतर ३० जानेवारी २०२१ रोजी शनिवारपासुन प्रेक्षकांसाठी नियमितपणे सुरु होत आहे.
सायन्स पार्कला भेट देताना १० वर्षाखालील बालके व जेष्ठ नागरिकांना प्रवेश नाही. मास्क वापरणे बंधनकारक राहिल. सायन्स पार्कमध्ये प्रदर्शन पाहताना एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवावे, या अटीशर्तीचे व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिल, असे आवाहन पालिकेने पत्रकाद्वारे केली आहे.