- स्थायी समितीची तब्बल १ कोटी १२ लाखांच्या खर्चास मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला वही, भूगोल नकाशा वही, प्रयोग वही तसेच, विविध अभ्यासपूरक पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
त्यासाठी तब्बल १ कोटी १२ लाख खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मंजुरी दिली. हे साहित्य कौसल्या पब्लिकेशनकडून खरेदी केले जाणार आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने वरील साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबविण्याचे आदेश १ ऑक्टोबर २०२० ला दिले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाला पूर्वीच्या पुरवठादाराकडून ते साहित्य खरेदी करावे लागत आहे.


















