- दुर्गा टेकडी परिसरात पालिकेकडून रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पालिकेचा आरोग्य विभाग व आयुक्तांकडे निगडीतील दुर्गा टेकडी येथे ‘मॉर्निंग वॉक’साठी जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दुर्गा टेकडी परिसरात रुग्णवाहिका सज्ज केली आहे.
निगडीतील दुर्गा टेकडीवर सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी दररोज दोन ते तीन हजार नागरिक जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणेची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती.
गेल्या काही दिवसापूर्वी एका वृत्तपत्राच्या मालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांना त्यावेळी आरोग्य मदत मिळाली असती तर, कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. याची दखल घेऊन अमित गोरखे यांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता.
















