- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाचा मोर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- आण्णाभाऊ साठेनगर, वाकड येथे भगवान गौतम बुध्दांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या जातियवादी अधिकारी वसंत नाईक याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) च्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.
त्या हरामखोर अधिकाऱ्याला बडतर्फ करा, अशी मागणी युवक आघाडीचे अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी आंदोलनावेळी केली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गवळी यांना निवेदन दिले.
यावेळी महासचिव बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवा नेते विनोद चांदमारे, वाहतुक आघाडी महा प्रदेश अध्यक्ष अजिज शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुजित कांबळे, पिंपरी चिंचवड युवक उपाध्यक्ष शाहरूख खान, युवा नेते अविनाश शिरसाठ, युवा नेते स्वप्नील कसबे, सुभाष गलांडे, सोनवणे, डोंगरे, विजय ठोसर आदी उपस्थित होते.
















