न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते विजय ओव्हाळ, विनोद गायकवाड हे उपस्थित होते.
















