- तरुणीने गळफास घेत केली आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- लग्नाचे आश्वासन देऊन लग्न करण्यास नकार देत तरुणीला शिवीगाळ करत मानसिक छळ केला. यामुळे नैराश्य आले. तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय बाळासाहेब राऊत (वय २३, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी धनंजय यांचे प्रेमसंबंध होते.
आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपीने लग्न करण्यास नकार देत तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ केला. यातून आलेल्या नैराश्यातून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. तसेच तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्या लिहून धनंजय राऊत याने फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.


















