- नकार देताच दुचाकीवरून दिले ढकलून; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- आरोपीने फिर्यादी महिलेला जबरदस्तीने चाकुचा धाक दाखवून त्याच्या गाडीवर बसवून नेले. माझ्याशी रिलेशन ठेव, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिला. त्यावेळी आरोपीने नाशिकफाटा येथे फिर्यादीला दुचाकी गाडीवरून ढकलून दिले.
यात त्यांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्या. तसेच फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील वेळोवेळी पाठलाग करून फिर्यादी यांची बदनामी केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. एमआयडीसी भोसरी येथे २१ डिसेंबर २०२० २८ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


















