- बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून अधिकृत दुजोरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- पुणे, खडकी, देहुरोडसहित राज्यातील ७ व देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल.
या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे. संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२० ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे सहा-सहा महिन्यांच्या दोन मुदतवाढ मिळाल्या होत्या. ही मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अधिकृत पत्र रक्षा संपदा किंवा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.