- शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार विस्कळीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- महापालिका क्षेत्रातील रावेत येथील जलउपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम असल्याने गुरुवारी पंप हाऊस बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही. तर शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रास रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. त्यानंतर प्राधिकरणातील केंद्रात जलशुद्धीकरण करून पाणीपुरवठा केले जाते. जलउपसा केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठ्याच्या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे, गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली.















