- पाच जणांना ८ ते ९ टोळक्यांनी केली मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- मोबाइलवर ‘शंकरपाळया’ विनोदी स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून पाच जणांना ८ ते ९ जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मळवंडी धरणाजवळ टेंट कॅम्पिंगवर ही घटना घडली. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश यशवंत मोहोळ (रा. तिकोणा पेठ) याने कामशेत पोलीस सुमारास ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कामशेत संकेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ यशवंत मोहोळ यांच्या सनसेट पर्यटन शेडगे कॅम्पिंग येथे फिर्यादी गणेश, त्यांचा भाऊ दिगंबर, वडील यशवंत मोहोळ, अमोल मोहोळ, किरण आडकर लाईट डेकोरेशनची कामे करीत होते. याचवेळी शंकर मोहोळ याने दिगंबरला फोन करून तुझ्या मोबाइल स्टेटसवर ‘ शंकरपाळ्या ‘ हे विनोदी स्टेटस का ठेवले असे विचारले. यावर दिगंबरने हे स्टेटस अनेकांच्या मोबाईलवर असल्याने मीही ठेवल्याचे सांगितले.
यावर शंकर मोहोळ याने मला चिडवण्यासाठी हे स्टेटस ठेवले असल्याचे सांगितले. त्याच दिवशी शनिवारी (दि. ३०) साडेसातच्या सुमारास गावातील शंकर मोहोळ, संकेत सहादू मोहोळ, मोहन काशिनाथ मोहोळ (रा. तिकोणा पेठ), किरण शेडगे, सागर गायकवाड (रा. आर्डव), संभाजी कोंडे (रा. डोणे) यांच्यासह अन्य तीन जणांनी कॅम्पिग साईटवर येऊन फिर्यादी व अन्य जणांना मारहाण केली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.















