- एका दुचाकी चोराला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरीमधून रिक्षा, निगडीतून दोन दुचाकी अशी तीन वाहने चोरीला गेली आहेत. समाधान माणिक म्हस्के (वय ४१, रा. भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाजीद अलकी अन्सारी (वय २८, रा. जनता बेकरी जवळ, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.
फिर्यादी म्हस्के यांची सहा हजार रुपये किमतीची एमएच – १४ – सीयु -०९४० रिक्षा आरोपी अन्सारी याने म्हस्के यांच्या घरासमोरून चोरून नेली. कांचन दिलीप पाटील (वय ३४, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची १५ हजार रुपये किमतीची एमएच -१९ – एए -५२८७ निगडीमधील पवळे उड्डाणपुलाखाली असलेल्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली आहे.
किरण दादू वंजारी ( वय ३४, रा. बापरे कॉलनी, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फियांदीनुसार त्यांची दहा हजाराची एमएच – १४ – एक्यू -८५२८ दुचाकी चोरट्यांनी अप्पर तहसीलदार कार्यालयासमोरून सोमवारी (दि. १) दुपारी चोरून नेली आहे.














