- पार्किंग पॉलिसीला स्थायी समितीकडून मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- शहरासाठी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेमार्फत राबवित असलेल्या पार्किंग पॉलिसीला स्थायी समितीने अखेर बुधवारी (दि. ३) हिरवा कंदील दाखविला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ मार्चपासून शहरातील ६ भागांत केली जाणार आहे.
गेल्या ३ वर्षांपासून रखडलेल्या यायोजनेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलत तो विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला. त्यास अखेर आज समितीने मंजुरी दिली.
एका तासासाठी दुचाकी व रिक्षासाठी ५ रूपये, मोटारी, टेम्पोसाठी १० रूपये, मिनी बससाठी २५ रूपये, ट्रक व खासगी बससाठी १०० रूपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. पार्किगासाठी शहराचे ६ भाग केले आहेत. रात्रीच्या एका दिवसाचे आणि वर्षभराच्या पार्किंगसाठी दर निश्चित केले आहेत.
भाग १. निगडी वाल्हेकरवाडी स्पाइन रस्ता, भाग २ : थेरगाव गावठाण रस्ता, थेरगाव पुणे – मुंबई जुना महामार्ग, टिळक चौक ते फाटा ते प्रसुंधाम लिंक रस्ता , औंध – रावेत प्राधिकरणातील विग इंडिया चौक, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे. भाग ३ : टेल्को रस्ता, नाशिक फाटा ते स्थानकाजवळील दोन्ही बाजू. भाग ४ : वाल्हेकरवाडी रस्ता, हिंजवडी. भाग ५ : निगडीतील भक्ती – शक्ती समूह, चिंचवड स्टेशन, काळेवाडी फाटा ते एम्पायर. नाट्यगृह व इस्टेट. भाग ६ : केएसबी चौक ते चिंचवड मोकळ्या जागा.














