- भक्ती शक्ती ग्रेड सेपरेटरच्या दिवाबत्तीसह ३५ कोटींच्या खर्चास स्थायीची मंजुरी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कामांसाठी येणा-या एकूण सुमारे ३५ कोटी ४० लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
ड. ग आणि ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनाधिकृत भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्याकामी रक्कम रुपये ७ कोटी ८४ लाख खर्च होणार आहेत. ड क्षेञीय कार्यालयाअंतर्गत नदी आणि नाल्यामधील ड्रेनेज लाईन, चेंबर्सची देखभाल आणि दुरुस्तीची कामे
करण्याकरीता रक्कम रुपये ५३ लाख खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र १२ मधील नाला दुरूस्तीची कामे करण्याकामी रक्कम रुपये २५ लाख खर्च होणार आहेत.
प्रभाग क्र.१२ तळवडे गाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी रक्कम रुपये ४६ लाख खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र.१ मधील सोनवणेवस्ती परिसरातील अंतर्गत रस्ते आणि प्रभाग क्र.१२ मधील रूपीनगर इंद्रायणीनगर सोसायटी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी रक्कम रुपये ३६ लाख खर्च केले जाणार आहेत.
कासारवाडी भाजीमंडई विकसित करण्याकामी रक्कम रुपये १ कोटी ९० लाख खर्च केले होणार आहेत. भक्ती शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर आणि उडडाणपुलाचे दिवाबत्ती व्यवस्था आणि विद्युत विषयक कामे करण्याकामी रक्कम रुपये ३ कोटी ९९ लाख खर्च केले जाणार आहेत.














