- कर्जाच्या सिक्युरिटीसाठीचा चेक वटवून लाखोंची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- फिर्यादीचे एसबीआय बँकेत लोन अकाऊंट आहे. आरोपी हे बँकेमध्ये व्यवस्थापक आणि तत्सम पदावर कार्यरत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडून कर्जाच्या सिक्युरिटीसाठी आणखी एक कोरा चेक सही करून देण्यास सांगितले. त्यानुसार कोरा चेक दिला. तो चेक भरून आरोपींनी ६५ लाख रुपयांची रक्कम आरोपींच्या खात्यात ट्रान्स्फर केली. याबाबत विचारणा केली असता दोन दिवसांसाठी ही रक्कम ट्रान्स्फर केली असून दोन दिवसानंतर पैसे पुन्हा खात्यात येतील, असे फिर्यादीस सांगण्यात आले.
दोन दिवसात रक्कम खात्यात जमा न झाल्याने ते पुन्हा बँकेत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच फिर्यादीस खोट्या गुन्ह्यात अडवण्याची धमकी दिली. याबाबत धनेश वसंतराव माळी (वय ३४, रा. बाणेर रोड, औंध) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०१९ रोजी कासारवाडी येथील एसबीआय बँकेच्या शाखेत घडला आहे.
महिताब श्रीवास्तव (वय ४८, रा. एम्पायर स्क्वेअर, चिंचवड), संजय शेवाडे (रा. सांताक्रुज ईस्ट, मुंबई), ए एस मुखर्जी, मे प्रतिभा कृषी प्रकिया ली. चे डायरेक्टर सतीश चव्हाण आणि अश्विनी सतीश चव्हाण (दोघे रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.














