न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०४ फेब्रुवारी) रोजी ११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीमधील चऱ्होलीतील ५५ वर्षीय पुरुषाचा तर, हद्दीबाहेरील मरकळमधील ७२ वर्षीय व खालापूरमधील ६९ वर्षीय स्त्रीयांचा मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १००६४१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६७९५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८१६ जणांचा मृत्यू झालेला आहे.














