- विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र अत्यल्प; महापौरांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- कोरोनाच्या महामारीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग आज सुरू झाले.
१ लाख १९ हजार २०० विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी अवघे २५ हजार ७४५ विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजेच अवघ्या २१ टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग आज सुरू झाले. शाळेमध्ये करोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात आल्या.
शाळेमध्ये गुरूजन व विद्यार्थी यांनी शाळा सुरु झाल्याने हजेरी लावली. शहराच्या महापौर माई ढोरे यांनी सांगवी.म.न.पा.शाळा व नृसिंह हायस्कूल येथे जाऊन विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क व गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले.














