- तिघांना पोलिसांकडून बेड्या तर, एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करून तलवारीने केक कापणाऱ्या तिघांना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल रेणूरेड्डी (वय २४, रा. मेन बाजार, आंबेडकरनगर, देहूरोड), शाकिब शौकत मोमीन (वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, देहूरोड), अश्रफ मेहबूब शेख (वय २१, रा. मेन बाजार, रौनक शोरूम मागे, देहूरोड) यांना पोलिसांनी अटक केली असून, शाहरुख शेख (वय २०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
देहूरोड मेन बाजार येथे ३१ जानेवारीला मध्यरात्री तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. रेही याच्या मोबाईलमध्ये त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ होता. त्यात अटक केलेले आरोपी तलवारीने केक कापताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत शाहरुख शेख दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














